कोल्हापूर जिल्हा भाजपचे नेते व माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे (Raje Samarjit Ghatge) यांनी भाजपला अधिकृत रामराम केला आहे. 29 ऑगस्ट रोजी त्यांनी सोशल मीडियावर अधिकृत घोषणा करून शरद पवार गटात सामील होण्याचा निर्णय जाहीर केला. घाटगे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे संकेत दिल्याने ही वाटचाल अपेक्षित होती.
आज सकाळी (३ सप्टेंबर २०२४) राजे समरजितसिंह घाटगे यांच्या निवास्थानी शरद पवार ब्रेकफास्ट करण्यासाठी दाखल झाले होते. आज संध्याकाळी कागलच्या गैबी चौकात दहा वर्षांनंतर शरद पवारांची सभा होणार आहे . शरद पवार हे ४ दिवस कोल्हापुरात मुक्काम करणार आहेत.
संध्याकाळच्या सभेचे लाईव्ह प्रेक्षेपण आपण येथे खाली दिलेल्या लिंक वर पाहू शकाल .
कागल येथे नुकत्याच झालेल्या मेळाव्यात घाटगे यांनी स्वराज्य पुन्हा निर्माण करण्याच्या गरजेवर भर दिला आणि प्रत्येकाने या ध्येयासाठी वचनबद्ध होण्याचे आवाहन केले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कागलच्या हितासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याची तयारी त्यांनी दर्शवली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा इरादा असल्याचेही घाटगे यांनी उघड केले.
"प्रवेशासाठी पवार साहेब कागलमध्ये येणं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट" राजे समरजीतसिंह घाटगे
2019 च्या निवडणुकीवर विचार करताना घाटगे यांनी कबूल केले की आपण पूर्णपणे तयार नव्हतो तरीही त्यांनी निवडणूक लढवली. सध्याची परिस्थिती ही त्यांची आणि कागलची वैयक्तिक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. शरद पवार यांच्याशी भेट घेतल्यानंतर आपल्या निर्णयावर विचार करण्यासाठी थोडा वेळ द्यावा, असा सल्ला घाटगे यांना देण्यात आला. मात्र, कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी कागलच्या जनतेशी चर्चा करू, असे आश्वासन त्यांनी पवारांना दिले. त्या नंतर आज (३ सप्टेंबर २०२४) रोजी कागलचे नेते समरजीत घाटगे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
Reviewed by Nikhil (Admin)
on
September 03, 2024
Rating:

No comments: